Projects

इ-स्कुल - शिक्षण तुमच्या दारी

एकावेळी २६ विद्यार्थी टॅबद्वारे शिक्षण घेऊ शकतील अशी सुसज्ज बस दोन शिक्षकांसह अटॉस सिंटेल तर्फे १५ ऑगस्ट २०१७ पासून उपलब्ध करण्यात आलेली आहे. ही बस गुणली तलाव आणि शिवाजी तलाव, घणसोली येथील वस्त्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी जाते. ही बस, टॅबद्वारे गणित शिकवण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांच्या वस्तीत आठवड्यातून तीन दिवस ठराविक वेळी येते. सकाळी तीन वर्ग आणि दुपारी तीन वर्ग या बसमध्ये चालतात. ही सोय ५वी , ६वी व ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी, ही सोय उपलब्ध केलेली आहे. चालत्या फिरत्या शिक्षणाची सोय 'शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारात' देणारा हा अनोखा प्रकल्प आहे. या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद असून एकंदरीत १४४ विद्यार्थी दर वर्षी याचा लाभ घेतात. इतर बऱ्याच कंपन्यांनी सुद्धा या प्रकल्पाबाबत उत्सुकता दर्शवलेली आहे.

Activity Supported by Atos Syntel

दिशा वर्ग - उपक्रम

कष्टकरी समूहात शिक्षणाचे सातत्य राखणे गरजेचे आहे. हे सूत्र हाती घेऊन तुर्भे येथील आंबेडकर नगर व इंदिरानगर येथील गरीब वस्तीतील प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या व घरच्या अडचणी मुळे शाळेत न जाणाऱ्या मुला -मुलींसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरु केले आहेत.याला "दिशा वर्ग 'असे नाव दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेत होणाऱ्या परीक्षेतील ग्रेड मध्ये सुधारणा, वागणुकीतील बदल, शिकलेच पाहिजे ही जाणीव व मुख्य म्हणजे वाईट सवयींपासून झालेली मुक्तता हीच या पूरक शिक्षणाची दिशा आहे. रोज संध्याकाळी 6.30 ते 8.30 यावेळेत वस्तीतीलच 30 घरामध्ये हे वर्ग भरतात. एकूण 300 मुलं -मुली रोज या वर्गामध्ये शिकत आहेत. हा उपक्रम लुब्रीझोल कंपनीच्या सहकार्याने व आर्थिक मदतीने सुरु आहे.

Since 2016

Activity Supported by Lubrizol

जिज्ञासा ,सावली - उपक्रम

वाढत्या वयात अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात, पण त्याची उत्तरे कोण देईल, याची माहिती नसते. काही प्रश्न खूपच वैयक्तिक व खाजगी स्वरूपाचे असतात त्या मुळे पालकांना वा शिक्षकांना ते विचारण्यास विद्यार्थी घाबरतात. आपल्या मनातील प्रश्न मग खास मित्र वा मैत्रिणींना विचारले तर त्यांना ही त्याची उत्तरे माहित नसतात. मग याच सोशल मीडियाचा येणारी अर्धवट., अपुरी व काही वेळा चुकीची माहिती मिळते. यामुळे गैरसमज अधिक वाढतात. शिक्षकांना कितीही इच्छा असली तरी त्यांना सर्वाना शिकवणे व अन्य कामात प्रत्येकाला वेळ देणे शक्य नसते. याकरताच "वी नीड यू सोसायटी " ने 'जिज्ञासा ' उपक्रम 'ज्ञानविकास विद्यालय 'कोपरखैरणे याठिकाणी सुरु केला आहे. या विषयात तज्ञ् असलेली श्रद्धा पेडणेकर सोमवार ते शुक्रवार विद्द्यार्थ्यांना मार्गदर्शन करते, विद्यार्थी अभ्यासाच्या व वैयक्तिक शंका मोकळेपणाने विचारू शकतात, ही विचारलेली माहिती व प्रश्न हे कोणालाही सांगितले जात नाहीत. हा जिज्ञासा -सावली उपक्रमात मुला -मुलींच्या वागण्यातील बदल का? हे जाणून घ्यायला पालक ही समुपदेशकला भेटू शकतात

2019

Activity Supported by Atos Syntel