COVID-19 Relief Activity In Ghansoli, Navi Mumbai

COIVD-19 - एप्रिल, मे, जून 2020 या लॉकडाउन काळातील ‘वी नीड यू’ सोसायटी घणसोली, नवी मुंबई यांचे तीन महत्त्वाचे मदत कार्यक्रम

1. NMMC, च्या सहाय्याने घणसोली मधील कष्टकरी व स्थलांतरित मजुरांना 39,944 शिजवलेल्या जेवणाचे पाकीट वाटप
2. Atos-Syntel, Sprayas Foundation, सहाय्याने घणसोली मधील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या कुटुबियांना धान्य वाटप
3. Lubrizol India Pvt Ltd, च्या सहकार्याने आंबेडकर/इंदिरानगर, तुर्भे येथील कंत्राटी कामगार तसेच ‘दिशा प्रोजेक्ट’ मधील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना शिधावाटप

‘वी नीड यू’ सोसायटी ही नोंदणीकृत स्वंयसेवी संस्था गेली 35 वर्षे घणसोली गावातील बालवाडी व प्राथमिक/माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवित आहे.
हे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य करत असताना ही करोना आपत्ती ओढवल्यावर सर्व उपक्रम स्थगित झाले. पुढील काम काय करायचे याची चर्चा सुरू असताना आपण, मुख्यमंत्री आपत्ती योजनेसाठी पैसे द्यावे असे जयंत कुलकर्णी यांनी सुचविले. तसेच गरजुना जेवण द्यावे ही कल्पना अतुल गोरे यांनी मांडली. सेंटरच्या समोर राहणारी अश्विनी मोहिते – कर्मचारी - हिने तयारी दर्शवल्यावर मग पोलीस व महानगरपालिका यांच्याशी संजीव साने यांनी संपर्क केला. त्यातून 'कम्युनिटी किचन' चालविण्याची कल्पना प्रत्यक्षात आली. सुरवातीला काही दिवस चालवावे लागेल असे वाटले पण प्रत्यक्षात हे किचन 63 दिवस चालवावे लागले. अश्विनी मोहिते आणि कुटुंबीयांनी आणि इतर तीन सहकार्याच्या साहाय्याने प्रत्यक्ष जेवण बनविण्याची जबाबदारी पार पाडली तर ‘वी नीड यू’ च्या टीमने गुणवत्ता नियंत्रण, खाते व प्रशासनाची जबाबदारी घेऊन हा महत्वाचा उपक्रम पार पाडला.

1. NMMC च्या, सहाय्याने घणसोली मधील कष्टकरी व स्थलांतरित मजुरांना शिजवलेले जेवणाचे पाकीट वाटप

करोंनाच्या एप्रिल, मे, जून या लॉकडाउन काळात घणसोली परिसरातील प्रवासी कामगार व ज्यांचे रोजगार बंद झाले अशा एकूण 39,944 गरजू नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिका घणसोली वॉर्ड कार्यालयाच्या कृतीशील सहभागाने संस्थेने तयार जेवणाचे वाटप केले. पालिकेकडून संस्थेच्या या उपक्रमास ‘कम्युनिटी किचन’ची मान्यता मिळाली आहे.

या कार्यासाठी हिंदुस्तान प्लॅटिनमचे मा. अभय चोकसी यांनी प्रमुख वाटा उचलला तसेच ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती अशा 82 जणांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून सहकार्य केले.

2. Atos-Syntel, Sprayas Foundetion च्या, सहाय्याने घणसोली मधील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या कुटुबियांना धान्य वाटप

Atos-Syntel यांच्या संस्थेबरोबरच्या सहभागातून कॉमप्युटर सेंटर सुरू आहे. या अंतर्गत इयत्ता 5 वी ते 7 वी विद्यार्थ्याकरिता मॅथ्स लिटरसी व 8 वी ते पदवीधर विद्यार्थ्याकरिता NIIT चे कोर्सेस चालविले जातात या उपक्रमात एकूण 250 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

संस्थेतील बालवाडी व अभ्यासिकेत शिक्षण घेत असेलेले एकूण 156 विद्यार्थी व कॉमप्युटर सेंटरमधील 250 विद्यार्थी अशा एकूण 406 मुलांच्या पालकांना लॉकडाउन काळात Atos-Syntel ने रेशन किट वाटपाकरिता दिले होते,या किटमध्ये पीठ,तांदूळ,साखर,तेल,मीठ एकूण 16kg.जिन्नसचा समावेश होता,तीन टप्प्यामध्ये एकूण 300 जणांना वाटप करून झाले आहे,उर्वरित शिल्लक 106 जण गावी असल्याकारणाने वाटप करणे बाकी आहे.

3. Lubrizol India Pvt Ltd, च्या सहकार्याने आंबेडकर/इंदिरानगर, तुर्भे येथील कंत्राटी कामगार तसेच ‘दिशा प्रोजेक्ट’ मधील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना शिधावाटप

गरीब वस्तीतील मुला–मुलींचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी Lubrizol Pvt Ltd कंपनीच्या सहकार्याने संस्थेमार्फत आंबेडकरनगर व इंदिरानगर, तुर्भे येथे दिशा प्रोजेक्ट राबविला जातो, या अंतर्गत इयत्ता 1 ली ते 4 थी करिता मोफत शिकवणीवर्ग घेतले जातात. या माध्यमातून दरवर्षी एकूण 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तसेच या ठिकाणी एकूण 50 महिला/मुलींना टेलरिंग प्रशिक्षण देत आहोत.

लॉकडाउन काळात Lubrizol ने रेशन किट वाटपाकरिता दिले होते, या किटमध्ये पीठ, तांदूळ, साखर, तेल, मीठ असा एकूण 16kg चा जिन्नस होता, दिशा प्रोजेक्टमधील एकूण 300 विद्यार्थ्याच्या पालकांना, 30 शिक्षकांना व 21 टेलरिंग महिला/मुलींना व कंपनीतील 361 कंत्राटी कामगारांना संस्थेने रेशन किटचे वाटप केले आहे.

संस्थेतर्फे या सर्वांना कोरोना काळात प्रत्येकाने व्यक्तीगत व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन दिले जात आहे. या सर्व कार्यासाठी संस्था कर्मचारी: अश्विनी मोहिते, कल्पना म्हात्रे, निकिता जांगळे, माधुरी घुले, अनघा काकडे, रेखा पाटील, सिंधु गायकवाड, सुनीता लिंगावले व कार्यकर्ते : सौरभ मोहिते, शशिकांत मोहिते, साईराज म्हात्रे.

दिशा प्रोजेक्ट कर्मचारी: सविता कांबळे, वर्षा काटकर, महादेव वाकळे, राहुल दास या सर्वांनी सक्रिय भाग घेतला.

संस्थेचे कार्यकारी सचिव : संजीव साने यांच्या पुढाकाराने हे काम पार पडले.

संस्थेचे अध्यक्ष: मकरंद घारपुरे, सचिव: शामल सोमण, खजिनदार: अतुल गोरे, विश्वस्त: जयंत कुलकर्णी व इतर पदाधिकारी या सर्वांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले.

वी नीड यू सोसायटी 23/APR :
लोकडाऊनची दुसरी फेज 15 एप्रिल ते 3 मे असणार आहे, आपण घेतलेली जबाबदारी वाढली आहे, आपण घणसोली परिसरातील रोजंदारी कामगार व त्यांच्या कुटुंबांना रोज 700 जेवणे देत आहोत, 23 एप्रिल पर्यंत एकूण १३६२८ जेवणे दिली आहेत. या कामास अनेकांचा हातभार लागत आहे.
कठीण स्थितीत कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे राहता आले व यात संस्थेच्या अश्विनी मोहिते, कल्पना म्हात्रे , निकिता जांगळे, प्रभाकर चव्हाण तसेच अन्य भोजन करणारे सहकारी यांच्या धाडसाला सलाम

अटॉस सिंटेलच्या साहाय्याने संस्थेतील विद्यार्थी आणि कर्मचारी यांना धान्य वाटप

लुब्रीझोल कंपनीच्या सहाय्याने तुर्भे कंत्राटी कामगारांना रेशन किट वाटप

नवी मुंबई महानगर पालिकेच्या साहाय्याने घणसोली येथे जेवण वाटप